रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनारी वकिलावर तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पेश रविंद्र जाधव (वय-27 वर्षे, रा.घर नं. 107, मु. पो. नाखरे, भगवतीवाडी, ता.जि. रत्नागिरी, सध्या रा. बाळासाहेब खेर सर्वोदय, छात्रालय, टिळकआळी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कल्पेश जाधव हे आपली दुचाकी (एम. एच08 ए.यु. 2683) घेऊन मांडवी समुद्र किनारी गेले होते.

या ठिकाणी दुचाकी पार्क करून गाडीवर बसून कानामध्ये मोबाईलचे इयर इअरफोन लावून गाणी ऐकत होते.

त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या दिशेने आला व गाडीकडे बघून व माझ्या गाडीवरील पुढील बाजुस असलेला वकीलीचा लोगो पाहुन पुढे जाऊन उभा राहिला.

त्यानंतर दोन अनोळखी पुरुष इसम आले व त्यापैकी एकाने मला गांजा आहे का असे विचारले.

त्यावर मी त्यांना नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांनी हा वकील आहे असे म्हणून त्यापैकी एकाने अचानक जाधव यांची मान हातांच्या बगलेमध्ये धरुन मारण्याच्या हेतूने दाबली.

त्यानंतर एका इसमाने माझ्या गाडीला लावलेले माझे हेल्मेट माझ्या डोक्यावर मारले.

त्यानंतर त्या तिघांनी मिळून संगनमताने लाथाबुक्याने मारहाण केली.

त्यानंतर त्यापैकी एकाने जाधव यांचे तोंड गुदमरण्याच्या हेतूने वाळुमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी जाधव हे पळून जाऊ लागल्याने त्या तीनही इसमांनी त्यांच्या मागे काचेच्या बाटल्या फेकुन मारल्या.

त्यानंतर त्या तीन इसमांनी जाधव यांची दुचाकी गाडीवर लाथा मारुन नुकसान केले.

मारहाण करणाऱ्या तिघांचे वर्णन जाधव यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.