राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ (महालक्ष्मी) हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व विशेष हेलिकॉप्टरने चिपळूण, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता पवन तलाव हेलिपॅड, चिपळूण येथे आगमन व मोटारीने रामपूर, ता. चिपळूण कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता नोकरी महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती. (स्थळ : मिलींद महाविद्यालय, रामपूर, ता. चिपळूण,जि. रत्नागिरी). दुपारी 12.30 वाजता रामपूर, ता. चिपळूण येथून मोटारीने आमदार भास्करराव जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 01.00 वाजता आमदार भास्करराव जाधव यांचे निवासस्थान, सुवर्ण भास्कर, पाग-जोशी आळी, ता. चिपळूण येथे आगमन व राखीव. दुपारी 01.20 वाजता आमदार भास्करराव जाधव यांचे निवासस्थान चिपळूण येथून मोटारीने पवन तलाव हेलिपॅड,ता. चिपळूण कडे प्रयाण.दुपारी 01.30 वाजता पवन तलाव हेलिपॅड, चिपळूण येथे आगमन व विशेष हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*