दापोली – क्षितीज कलामंच, दापोली यांच्या वतीने दापोलीतील दर्दी व्यक्तिमत्व बलवंत फाटक यांच्या जीवनातील काही निवडक आठवणींवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘एक शाम बलवंत के नाम’ तो त्याच्या आठवणी आणि आपण’ या कार्यक्रमात बलवंत फाटक यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.
बलवंत फाटक एक कुशल साऊंड ऑपरेटर होते आणि त्यांना कविता व गाण्यांची विशेष आवड होती.
त्यांच्या आठवणींना समर्पित हा कार्यक्रम १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता पद्मश्रद्धा हॉल, नर्सरी रोड, दापोली येथे होणार आहे.

या कार्यक्रमात दापोलीतील अनेक मान्यवर व्यक्ती बलवंत फाटक यांच्यासोबतच्या त्यांच्या आठवणी, अनुभव आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलणार आहेत.
बलवंत फाटक यांच्या मित्र-परिवार, सहकारी आणि जवळचे लोक त्यांच्या संगीत आणि कवितेच्या आवडीबद्दल, त्यांच्या कामातील किस्से, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपले विचार व्यक्त करतील.
बलवंत फाटक यांच्या आठवणी आमच्यासाठी खूप अनमोल आहेत. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करत आहोत,” असे क्षितीज कलामंचच्या सुनील कदम यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाचे प्रायोजक ANMOL DECO आहेत. ‘काही क्षण अनमोल असतात…’ हे ANMOL DECO चे ब्रीदवाक्य कार्यक्रमाच्या थीमला साजेसं आहे, कारण बलवंत फाटक यांच्या आठवणी, त्यांचे संगीत प्रेम, आणि कवितांमधील रस हे सर्व अनमोल क्षण आहेत.
या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त दापोलीकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे