हर्णे: सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटी हर्णेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ. रऊफ हजवाने यांची अध्यक्षपदी आणि माजीद महालदार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
हर्णे मच्छीमार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक झाल्यानंतर माजी उपाध्यक्ष व दि हर्णे एज्युकेशन सोसायटीचे सचिव मुबीन हारगे, दि हर्णे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असलम खान, बाजार मोहल्ला अध्यक्ष निसार ढेणकर, कादर मेमन, आदिल गांवकर, वाजीद खान, इर्शाद महालदार, नदीम वालफ, इम्रान मख्जनकर, असलम अकबाणी, शाहवेज नौशेकर, सरफराज शितवारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.