दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.

या स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए.जी. हायस्कूल, दापोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

14 वर्षाखालील गट:
मुलींमध्ये समृद्धी धाडवे हिने द्वितीय क्रमांक, तर वेदा खंकाळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये आदी भांबीड याने द्वितीय क्रमांक मिळवला.

17 वर्षाखालील गट:
मुलींमध्ये पल्लवी भुवड हिने प्रथम, ऋतुजा पवार हिने द्वितीय, तिर्था कारंडे हिने तृतीय आणि स्पृहा फाटक हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. मुलांमध्ये वेदांत राणे याने तृतीय आणि स्वराज मांजरे याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.

19 वर्षाखालील गट:
मुलींमध्ये पायल पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.

वरील १० खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंचे दापोली एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, स्कूल कमिटी चेअरमन रविंद्र कालेकर, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, मार्गदर्शक प्रथमेश दाभोळे, प्रदीप शिगवण, आकांक्षा अस्वले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.