रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कणकवली देवगडचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे मन जपून आपल्या परिवारातील सदस्य म्हणून त्याचे काम तडीस न्हेणारे नेतृत्व म्हणून संपुर्ण कोकण आणि महाराष्ट्र निलेश राणे यांना ओळखतो.
निलेश राणे सक्रिय राजकारणातून बाजूला जाऊन ते कार्यकर्त्यांना आणि जनसामान्य माणसाला एकाकी पडू देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ॲड. बंटी वणजू यांनी दिली आहे.
खासदार असताना त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सर्वसामान्य माणसांची कामे करतानाचा झंजावात संपूर्ण कोकणाला माहित आहे. कुडाळ मालवणमध्ये त्यांनी केलेल्या कामांची पोचपावती म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक ग्रामपंचायतींवर मिळवलेला विजय असेल किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय असेल आज संपुर्ण कोकण निलेश राणेंकडे मोठ्या आशेने बघत आहे, अशा भावना बंटी वणजू यांनी व्यक्त केल्या आहेत.
निलेश राणे हे सक्रिय राजकारणातून बाजूला जाऊन ते कार्यकर्त्यांना आणि जनसामान्य माणसाला एकाकी पडू देणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी निवृत्तीचा मागे घेतलेला निर्णय. हा सर्वसामान्य माणसाला आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाराच आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते अॅड बंटी वणजू यांनी व्यक्त केला आहे.