रत्नागिरी
रत्नागिरीतील समाजसेविका निकीता कांबळे यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा (भाकर ) संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला.

या पुरस्काराचे वितरण आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे करण्यात आले. हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर भाकर सेवा संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक रावसाहेब सराटे, भाकर सेवा संस्थेच्या अध्यक्षा मंगल पोवार, भाकर सेवा संस्थेचे सचिव अश्विनी मोरे आदि उपस्थित होते.

भाकर सेवा संस्थेच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या संस्थापिका स्व. अरुणा पाटील यांच्या नावाचा समाज सेविका अरुणा हा पुरस्कार निकीता कांबळे यांना सुपूर्द करण्यात आला.

अरुणा पुरस्कार विजेत्या निकीता कांबळे यांनी अनेक समाजिक उपक्रमात सहभाग घेऊन समाज कार्य केले आहे. 1998 पासून स्व. अरुणाताई यांचे सोबत भाकर संस्थेत कामाला सुरुवात केली. लांजा तालुक्यातील 40 बालवाडीत सुपरवायझर म्ह्णून काम केले.

भाकर इंडो जर्मन प्रकल्प, माता बाल संगोपन, पाणलोट प्रकल्प, आधुनिक शेती, महिला समुदेशन केंद्र, बालकामगार, वेठबिगारी अशा विविध समाजिक प्रकल्पतुन आपली छाप उमटवली आहे.

त्यांनी सखी वनस्टॉप तसेच 2020 पासून संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी च्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण मदत केंद्रात कोओरडईनेटर म्हणून काम करत आहेत.

दररोज 150 ते 200 रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना शासकीय लाभ मिळवून देण्याचे काम निकीता कांबळे करत असतात.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील एकूण 21 समाजसेवक, समाज सेविकांचा सत्कार करण्यात आला.