तालुका प्रमुख उन्मेष राजे यांनी घेतला पुढाकार
दापोली : केळशी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
ही गोष्ट दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांना समजताच त्यांनी तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्या नेतृत्वाखाली जीवनाश्यक वस्तू काही तासांच्या कालावधीत संबंधित बाधित व्यक्तींना देण्याची व्यवस्था केली.
यावेळी दापोली शहर प्रमुख प्रसाद (पप्पू) रेळेकर, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर ,शहर अधिकारी स्वप्निल वि. पारकर, नगरसेविका शिवानी खानविलकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, युवासेना तालुका सचिव किरण बांद्रे, जालगाव शाखाप्रमुख मयूर मोहिते, शहर सचिव निखील परब, उपशहर अधिकारी ओंकार दुर्गावळे, धनराज गुजर, दीप शिर्के, आयेश पवार, नीरज दुर्गावळे, आकाश रेळेकर, साई कार्डोझा व शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.