दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक नितीन पेडणेकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन करण्यात आला. तर सौ. पेडणेकर यांचा संचालिका स्मिता सुर्वे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रविंद्र कालेकर म्हणाले की, पेडणेकर यांच्या कामातील अनुभवाचा इतरांनी सुद्धा परीसा प्रमाणे उपयोग करून घ्यावा. तसेच आज एकत्रित कुटुंब पद्धती कुठेही पाहायला मिळत नाही मात्र पेडणेकर यांचे चारही भाऊ गुण्या गोविंदाने एकत्र राहत असलेले पहायला मिळतात.

यावेळी संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे, मुख्याध्यापक सतीश जोशी, शिक्षक संदीप कान्हेकर, श्रीराम महाजन, चिखलगावचे क्लार्क मधुकर काळे, करजगावचे माजी कलाशिक्षक विद्याधर ताम्हणकर यांनी यांनी नितीन पेडणेकर यांच्या कामाची शैली व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर असलेले घनिष्ठ संबंध याचाही आवर्जून उल्लेख केला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना नितीन पेडणेकर म्हणाले माझ्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीमध्ये माझे कुटुंबीय त्याचबरोबर हितचिंतक आणि दापोली शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले असल्याचे म्हणाले. यावेळी ओजस तेरेदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.

या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक एस. एम. कांबळे पर्यवेक्षक एस.डी. माळी, डी.एम.खटावकर, नितीन पेडणेकर यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, दापोली तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र हांडे यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश आठल्ये यांनी केले तर आभार आर्या दाबके हिने मानले.