सचिवपदी ला.समीर कदम तर खजिनदार ला.अतुल मेहता
दापोली : लायन्स क्लब दापोलीची कार्यकारिणी सभा नुकतीच दापोली येथील लायन्स क्लब कार्यालयातील कै डॉ प्रशांत मेहता सभागृहात पार पडली. यावेळी वर्ष 2023-24 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सर्वानूमते ला. केतन वणकर यांची निवड करण्यात आली.
तर सचिवपदी ला.समीर कदम, खजिनदारपदी ला.अतुल मेहता, प्रथम उपाध्यक्ष म्हणून ला.कौशिक मेहता, द्वितीय उपाध्यक्ष म्हणून ला.फझल राखंगे, क्लब मेंबरशीप चेअरपर्सनपदी ला.मंदार केळकर ,क्लब LCIF चेअरपर्सन म्हणून ला.सुजय मेहता, क्लब सर्व्हिस चेअरपर्सन म्हणून ला.संदीप राजपुरे, क्लब मार्केटिंग चेअरपर्सनपदी ला.प्रसाद मेहता यांची निवड जाहीर करण्यात आली.
तसेच दापोली लायन्स क्लबचे संचालक मंडळात ला. श्रीराम माजलेकर, ला. डॉ दिलीप जोशी, ला. मनोहर जैन, ला. अरुण सावंत, ला. प्रमोद तलाठी, ला. सत्यजीत मालू, ला. राजीव करंदीकर, ला. सौं शैलजा जोशी, ला. उल्लास खटावकर, ला. निलेश हेदुकर, ला. अशोक रूपारेल, ला. चेतन जैन, ला. आशिष मेहता, ला. बिपीन मयेकर, ला. महेंद्र जैन, ला. महेश पाटोलिया, ला. सचिन तोडणकर, ला. अरुण गांधी, ला. आशिष अमृते, ला. उमेश नायक, ला. ऋषिकेश भागवत, ला. राजेश मेहता आणि ला.प्रशांत पुसाळकर असणार आहेत.
लायन्स क्लब ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. यंदा दापोली लायन्स क्लब अध्यक्षपदाचा सन्मान ला. केतन वणकर यांना मिळाला आहे.
आपल्या सर्व लायन्स क्लब सदस्यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. वर्षभरात समाजासाठी चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असेल.
वर्षभरात नागरिकांना चांगल्या सुविधा, नवीन उपक्रम, स्वच्छता या विषयावर काम करायचे आहे. त्यासाठी नूतन मला दापोलीकरांची साथ आवश्यक आहे ही भावना नुतन अध्यक्ष ला. केतन वणकर यांनी व्यक्त केली आहे.