दापोली – जयवंत जालगावकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दापोली अर्बन को. ऑप.बँक लिमिटेड ता. दापोली शच्या निवडणूकीत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. यंदाची ही निवडणूक बिनविरोध करून जयवंत जालगावकर यांनी बॅंकचे पर्यायाने सभासदांचे वीस लाख रूपये वाचवले आहेत. जयवंत जालगावकर यांच्या पॅनलच्या विजयाची आता केवळ औपचारिक घोषणा होणंच बाकी आहे.
बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण 20 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. तर 3 मतदार संघामध्ये एक-एकच अर्ज दाखल झाले असल्याने या मतदार संघाची निवडणूक आधीच बिनविरोध झाली होती. यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष संदिप दिवेकर, संचालक प्रमोद काटकर, संचालक माधव शेटये यांचा समावेश होता.
दापोली तालुका कार्यक्षेत्रातील सर्वसाधारण मतदार संघातून 9 प्रतिनिधी निवडून द्यायचे असून त्यासाठी अन्वर रखांगे, सौ. दिप्ती दिलीप जालगांवकर, जयवंत जालगावकर, सुभाष मालू, विनोद आवळे, प्रभाकर शिंदे, आशिष मेहता, दत्तात्रय बिवलकर, ॲड. ऋषिकेश भागवत, अशोक जाधव, शैलेश मोरे, चंद्रशेखर जोशी असे 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
महिला प्रतिनिधी म्हणून 2 जागा असून त्यासाठी सौ. दिप्ती दिलीप जालगावकर, मेघा केळकर, संगीता तलाठी असे 3 उमेदवारी अर्ज दाखल होते. अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी गटासाठी एक जागा असून त्यासाठी सौ. दिप्ती दिलीप जालगावकर व निलेश जयवंत जालगावकर असे 2 उमेदवारी अर्ज दाखल होते. इतर मागास प्रतिनिधी गटासाठी 1 जागा असून त्यामध्ये माधव शेटये तर भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटासाठी 1 जागा असून त्यासाठी संदिप दिवेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल होते. दापोली तालुका कार्यक्षेत्र वगळून उर्वरीत मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील निवडून दिलेला प्रतिनिधी जागा एक यांसाठी मंडणगड येथील प्रमोद काटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. प्राप्त अर्जांची दि. 24 एप्रिल रोजी म्हणजेच काल सोमवारी छाननी झाली आणि यामध्ये चंद्रशेखर जोशी, शैलेश मोरे आणि सौ. दिप्ती दिलीप जालगावकर यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं. आता केवळ विजयाची औपचारिक घोषणा होणंच बाकी राहिली आहे.
विजयी उमेदवार आणि मतदारसंघ
दापोली तालुका कार्यक्षेत्रातील सर्वसाधारण मतदारसंघ
1) जयवंत जालगावकर
2) अन्वर रखांगे
3) सुभाष मालू
4) विनोद आवळे
5) प्रभाकर शिंदे
6) आशिष मेहता
7) दत्तात्रय बिवलकर
8) ॲड. ऋषिकेश भागवत
9) अशोक जाधव
महिला प्रतिनिधी गट
1) मेघा केळकर
2) संगीता तलाठी
अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी गट
1) निलेश जयवंत जालगावकर
इतर मागास प्रतिनिधी गट
1) माधव शेटये
भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट
1) संदिप दिवेकर
दापोली तालुका कार्यक्षेत्र वगळून उर्वरीत मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील निवडून दिलेला प्रतिनिधी जागा
1) प्रमोद काटकर