दापोली : एकीकडे कोकणाने पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेमध्ये टॉप केल्याचा आनंद तर दुसरीकडे माटवण मध्ये 17 वर्षीय मुलांनं आत्महत्या केल्यास दुःख.

दापोली तालुक्यातील माटवण येथील कोळथरकोंड येथं राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलानं मोबाईल न दिल्यामुळे टोकाची भूमिका घेत आपलं जीवन संपवलं आहे. या बातमीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दापोली पोलीसांची आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद घेतली आहे. खबर देणाऱ्या आजीनं मुलाला मोबाईल देऊ नका असं सांगितलं. यामुळे नाराज होऊन मुलानं विषारी औषध प्राशन केलं. त्याला नातेवाईकांनी तातडीनं उपचारासाठी दापोलीतील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलं.

त्याच्यावर उपचार सुरू असताना आज दिनांक 17 जून 2022 रोजी सकाळी 7.35 मिनीटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.