दापोली : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या राज्य, विभागीय व जिल्हा अध्यक्ष, सचिव तसेच राज्य कार्यकारिणी सदस्यांची महामंडळ सभा आज ८ जुलै २०२० रोजी झुम मिटिंग द्वारे घेण्यात आली. या सभेचे आयोजन संघटना आयटी सेल प्रमुख ताजुद्दीन परकार त्यांनी राज्याध्यक्ष एम. ए. गफ्फार यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.
या प्रसंगी एम. ए. गफ्फार (राज्याध्यक्ष), राज्य सचिव शेख फयाजुद्दीन, राज्य प्रवक्ता जव्वाद हुसैन, राज्य कार्याध्यक्ष युनूस अन्सारी यांनी संवाद साधला व उपस्थित पदाधिकारी सदस्यांना मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम लद्दाख सीमेवर शहीद जवान व आपल्या कोरूना सारख्या महामारी प्रसंगी आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले डॉक्टर व कोरोना युद्धांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कोरोना महामारी काळात कोरोना योद्धा म्हणून अत्यंत तळमळीने काम करणारे राज्य प्रवक्ता जव्वाद हुसैन, त्यांचे सहकारी शिक्षक, तसेच प्रत्येक, जिल्ह्यात काम करत असणारे पोलीस मित्र व कोरोना योद्धा यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला प्रमुख्याने सदर सभेत संघटनेच्या बांधणी व संघटनेला मजबूत करण्यासाठी सर्व राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या प्रत्येक सदस्याने हिरिरीने काम करावे लॉक डाऊन काळात शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले. नवीन सभासद नोंदणी आजीव सभासद नोंदणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले तसेच लॉक डाऊन काळात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार शैक्षणिक काम करण्याची दिशा निश्चित करण्यात आली.
१) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद ४थी पर्यंतच्या शाळांना ५वी व ७वी पर्यंतच्या शाळांना इयत्ता ८वी नैसर्गिक वाढीने शासनाच्या धोरणानुसार मान्यता देऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना आरटीईअंतर्गत सक्षम करण्याच्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले.
२) नंदुरबार जिल्ह्याप्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी उर्दू शाळा आहेत तेथे केंद्रीय प्राथमिक शाळा योजना १९९४ नुसार केंद्रीय प्राथमिक शाळांची निर्मिती करून केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त करणे.
३) नगरपरिषद व महानगर परिषदांमध्ये उर्दू केंद्र व केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधणे.
४) विशेषतः रत्नागिरी व अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने उर्दू शाळा आहेत तेथे शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत त्या भरण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.
या प्रसंगी रियाज अहमद अन्सारी (राज्य उपाध्यक्ष), वासिक नवेद, रिजवान शेख, कयूम खान, मुश्ताक तांबे (विभागीय अध्यक्ष कोकण), बशीर परकार, शहानवाझ लोरे, हाशिम अली सय्यद , (विभागीय अध्यक्ष अमरावती), नाझिम रितपुरी, अहमद नाडकर, सिराज सोलकर, अब्दुल रहमान कुरेशी, लियाकत राऊत व डॉ. मुनीब हनफी यांनी चर्चेत सहभाग घेतला. शेवटी ताजुद्दीन परकार यांनी संघटनेची पहिली झूम सभा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले व परकार यांचे कौतुक करण्यात आले.