केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राशी संबंधित 2100 कोटींपर्यंतचे रस्ते प्रकल्प मंजूर केले आहेत.याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या मंजूर कामांमध्ये परभणी, नांदेड, गडचिरोली आणि बारामती या महामार्गांच्या कामांचा समावेश आहे. गडकरींनी एकामागून एक ट्विट करत कोणत्या रस्त्याच्या प्रकल्पासाठी किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे, याची माहिती दिली आहे.