देशभरात वाढत असलेल्या कोरोनामुळे CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. अभ्याक्रमाच्या मूळ गाभ्याला हात न लावता ३० टक्के भाग कमी करण्यात आला आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद हे विषय कमी महत्त्वाचे ठरवून वगळले गेले आहेत. NCERT आणि CBSE बोर्डाच्या तज्ज्ञांच्या एका समितीने 9 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला. तर 8 वी आणि त्यापेक्षा कमी वर्गांचा अभ्यासक्रम आराखडा शाळांनीच तयार करावा असं म्हटलं गेलं आहे.

 

भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरुप, जीएसटी, निती आयोग सारखे विषय १२वीच्या विद्यार्थ्यांना यंदा शिकवले जाणार नाहीयेत. त्याचबरोबर संरक्षण, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित विषय सुद्धा वगळण्यात आले आहेत. भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्याशी संबंधित धडे सुद्धा हटवण्यात आले आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता ऑगस्ट महिन्यापर्यंत शाळा उघडण्याची शक्यता नाही. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन क्लास सुद्धा सुरू केल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षकांसह पालक सुद्धा अभ्यासक्रम कमी करण्याच्या पक्षात आहेत.