दापोली- दापोली तालुक्यातील मांदिवली नवानगर येथून हजिरा बिलाल मुकादम (वय २२) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे.

दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हजिरा मुकादम दि. १४ मार्च रोजी रात्री १० ते दि. १५ मार्च सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मांदिवली नवानगर येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. तीचा घरच्या मंडळींनी शोध घेवूनही ती न सापडल्याने तिचे सासरे जाफर कासीम मुकादम यांनी अखेर दापोली पोलीस स्थानकात सूनबाई हरविल्याची तक्रार नोंदविली आहे. या घटनेचा पुढील तपास पो. हे. काँ. चौरे करीत आहेत.