मुंबई – पुढील महिन्यात म्हाडाकडून 1200 घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईजवळ घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

म्हाडाच्या या सोडतीमधील घरे ही ठाणे, नवी मुंबई कल्याण-डोंबिविली, वसई-विरार या महापालिका हद्दीतील आहेत. ही घरे 20 टक्के योजनेतील असणार आहे. राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे देण्यासाठी 20 टक्के योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात 4000 चौमी व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळात बांधकाम होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील 20 टक्के घरे राखीव ठेवण्यात आली आहे. ही राखीव घरे म्हाडाला देण्यात येतात. ही घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात.