कोकणवासीयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात होळीसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकारत असेल तर कारवाई करण्याचा निर्णय आज विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे.तसेच मुंबईहून जादाच्या बसेसही सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोकणात गणेशाेत्सव किंवा होळी या महत्वाच्या सणाला रेल्वे तसेच एसटीचे रिर्झवेशन आधीच बुक केले जाते. एेन सीझनवेळी खासगी बसेसे जादाचे भाडे आकारतात. राज्य सरकारने अवास्तव भाडे आकारण्यावर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडून अवास्तव भाडे कोणी आकरत असेल तुम्ही यासंदर्भात माहिती शासनाला कळवू शकता असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जादाच्या बसेसही मुंबईहून सोडण्यात येणार आहेत.