दापोली १५ मार्च:- दापोलीने इतके कडक तापमान मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पहिल्यांदाच पाहिले आहे. 14 ते 16 मार्च दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला होता.या अतिउष्ण हवामानामुळे सर्वांनी काळजी घेण्याच्या सूचनाही दोन दिवसापूर्वीच जिल्हाप्रशासनाने जारी केल्या आहे.
उसाचा रस बर्फ घातल्यशिवाय घ्या… उन्हातून आल्यावर फ्रिजमधील पाणी अथवा थंडपेये उभ्या उभ्या पिऊ नका.. थोडा वेळ आराम करा आणि पाणी अथवा पेय घ्या…. बाहेर पडताना डोक्यात टोपी,छत्री,सनकोटचा वापर करा…शक्यतो दुपारी साडेबारा ते चार पर्यंत गरज असेल तरच बाहेर पडा…धने जीरे घालून पाणी घ्या,लिंबूपाणी घ्या…खूप अति थंड पाणी (चिल्ड वाॅटर) आणि अति थंडपेये घेऊ नका. मात्र पाणी भरपूर प्या….पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्या…त्याना थंडावा जाणवेल अशी व्यवस्था करा…
उद्या पर्यंत तापमान अधिक रहाणार असल्याने प्रत्येकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे.