दापोली : ८ मार्च ते १२ मार्च 2022 दरम्यान जेसीआय दापोली या सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महिलांसाठी व्यावसाय मार्गदर्शन शिबिर, महिलांसाठीचे गेम्स, विशेष कार्य केलेल्या महिलांचा सन्मान तसेच दापोलीमधील व्यावसायीक महिलांसाठी आपला व्यावसाय प्रमोशन करण्यासाठी बिजनेस टू बिजनेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन दापोलीमधील होतकरु व्यावसायीक महिलांना आपला व्यावसाय इतर महिलांसमोर ठेवण्याची नामी संधी जेसीआय दापोली कडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी अतुल गोंदकर, सचिव जेसी मयुरेश शेठ आणि प्रकल्प संचालक मुश्ताक खान यांनी केलं आहे.