रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कृषी क्षेत्रावरही होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खतासाठी पूर्वीपेक्षा अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

खतांच्या उत्पादनासाठी पोटॅश आवश्यक आहे आणि भारतात पोटॅश मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. रशिया आणि बेलारूस हे पोटॅशचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत.

मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा धोक्यात आला आहे. युक्रेन देखील पोटॅश निर्यात करतो.

इक्राचे संशोधन प्रमुख रोहित आहुजा म्हणाले की, रशिया आणि बेलारूसवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुरवठा संकट आणखी वाढेल. शेतकऱ्यांना कमी दरात खते देण्यासाठी सरकारला आता आणखी अनुदान द्यावे लागणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा खत आयातीवर मोठा परिणाम होणार आहे. पेमेंट आणि लॉजिस्टिक्स त्याच्या आयातीमध्ये अडथळा बनतील, असे क्रिसिल रेटिंगचे संचालक नितेश जैन म्हणाले.

युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या किमतीतही वाढ झाली असून, त्याचाही परिणाम खताच्या किमतीवर होणार आहे.