कीव, 05 मार्च: एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून रशिया- युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरु आहे. आतापर्यंत या युद्धामुळे युक्रेनचं बरंच नुकसान झालं आहे. रशिया वारंवार युक्रेनवर हल्ले करत आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ (VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशिया एकामागून एक युक्रेनमधल्या शहरांवर कब्जा करत आहेत. त्यातच रशियानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

युक्रेनमधून नागरिकांना बाहेर करण्यासाठी रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रशियानं 6 तासांचं युद्धविराम घोषित केला आहे.