रशिया-युक्रेनच्या सघर्षात निष्पाप नागरिकांना हाल सोसावे लागत लागत आहे. युद्धामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत असून, भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी जमिनीखाली असलेल्या बंकरमध्ये आश्रय घेतला असून, आता तिथेही खाण्याचे प्रचंड हाल होत असल्याचं समोर आलं आहे.

रशियाने हल्ला चढवलेल्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या खार्किव्ह शहरातही प्रचंड भीतीचं वातावरण आहे. खार्किव्हमधील एका बंकरमध्ये आश्रयाला असलेल्या विद्यार्थ्यांनी तेथील परिस्थितीची माहिती बंकरमधून आम्हाला बाहेर काढा अशी आर्त साद भारत सरकारला घातली आहे.