रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्याला आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतर आता सरकारने या मोहिमेत भारतीय वायुसेनेलाही सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी आज भारतीय वायुसेनेचे विमान C-17 उड्डाण घेऊ शकते.