युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर अडकलेल्या भारतीयांचा पहिला गट शुक्रवारी सुसेवा सीमेवरून रोमानियाला पोहोचला. रोमानियामध्ये आलेले बहुतेक लोक विद्यार्थी आहेत आणि त्यांची संख्या सुमारे 470 आहे. आता या सर्वांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे पाठवले जात आहे. तेथून त्यांना भारतात परत आणले जाईल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या दोन फ्लाईट्स रवाना होणार आहेत. यांनी भारतीयांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. एअर इंडियाची दोन विमानं रवाना होणार आहेत. यामधील तीन विमानं रोमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि एक हंगेरीची राजधानी बुडापेस्ट – युक्रेनमधून रस्त्याने तेथे नेल्या जाणाऱ्या भारतीयांना परत आणण्यात येईल.
युक्रेनच्या पश्चिम सीमेवरून भारतीयांना बाहेर काढण्याचे आश्वासन पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना दिले. यानंतर त्यांनी रशियन सैन्याला त्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिली दोन उड्डाणे दिल्ली-बुखारेस्ट आणि मुंबई-बुखारेस्ट शुक्रवारी रात्री 9 आणि 10.30 वाजता उड्डाण करणार होती. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे विमाने अद्याप उड्डाण करू शकले नाहीत.
रशियाने स्थलांतरितांना त्यांचे पासपोर्ट, काही रोख रक्कम (शक्यतो यूएस डॉलर्स) आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितले की ते रोमानिया आणि हंगेरीमधून निर्वासन मार्ग तयार करण्यासाठी काम करत आहेत. एकदा हे मार्ग ठरल्यानंतर, युक्रेनमधून निघालेल्या भारतीयांनाही या ठिकाणी पोहोचणे आवश्यक असेल.