रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धावर अवघ्या जगाचं लक्ष आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली.

युद्धाच्या स्थितीत झेलेन्स्की यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. यावेळी एक लाखाहून अधिक आक्रमक घुसखोर त्यांच्या भूमीत आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला केलेलं हे आवाहन खूप महत्त्वाचं आहे. भारताने तटस्थ भूमिका घेतली होती पण युक्रेन मदतीची वाट पाहत होता. अशा स्थितीत आता दोन्ही बड्या नेत्यांची फोनवर चर्चा झाली. यात मदतीपासून ते समर्थनापर्यंत भर देण्यात आला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांच्यासाठी भारताने त्यांना संयुक्त राष्ट्र परिषदेत पाठिंबा द्यावा, हे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र या संपूर्ण वादावर भारताने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही, त्याची भूमिका तटस्थ असून चर्चेतूनच तोडगा काढण्याचा आग्रह धरत आहे.