रशियासारख्या मोठ्या देशासमोर युक्रेन ताकदीने उभा आहे. कोणत्याही किंमतीत झुकणार नाही, अशी भूमिका युक्रेनने घेतली आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की यांनी बजावली आहे.

व्होदिमर झेलंस्की स्वत: रणांगणात उतरले आहेत. ज्या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत, तेथे त्यांनी भेट दिली आहे.

व्होदिमर झेलंस्की यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्होदिमर झेलंस्की सैन्याच्या वेशात दिसत आहेत.

व्होदिमर झेलंस्की यांनी सैन्याची कपडे परिधान केले असून सैन्यासोबत परिस्तितीचा आढावा घेतना ते दिसत आहेत. व्होदिमर झेलंस्की हे आपल्या सैन्याचं मनोबल वाढवत आहेत.

दरम्यान, व्होदिमर झेलंस्की यांनी रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अनेक देशांनी युक्रेनला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.