राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर भाष्य केलं. कोणीतरी पहाटे ट्विट करतं अन् ED सकाळी घरी पोहोचते, हे कसं काय? असा सवाल अजित पवार यांनी केला. याशिवाय, एक पक्ष सोडून सगळ्या पक्षांच्या नेत्यांवर धाडी पडतायत, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.