दापोली तालुक्यातील जालगाव लष्करवाडी येथील रहिवासी ऐश्वर्या मंगेश सावंत ही सध्या युक्रेनमध्ये अडकली आहे. मात्र ती सुखरूप असल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली

ऐश्वर्याचे वडील दापोली अर्बन बँकेच्या दापोली शाखेचे माजी व्यवस्थापक आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या ही युक्रेन येथील ऑडीसी या शहरांमध्ये राहते. तिथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

सध्या ती वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात आहे. तिचं हे सहावं वर्ष आहे. हे वर्ष पूर्ण करून ती दापोली परतणार होती. मात्र सध्या तिथे सुरू झालेल्या रशिया युक्रेन या युद्धामुळे ती युक्रेनमध्ये अडकली आहे. मात्र ती सुस्थळी असून सुखरूप असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.