रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यामुळे आता जगभरामध्ये रशिया आणि युक्रेनच्या लष्करी सामर्थ्याची चर्चा सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनकडे नेमकं किती लष्करी सामर्थ्य आहे? यावर टाकलेली नजर…
सैनिक किती?
जगातील सर्वाधिक शक्तीशाली लष्कर असणाऱ्या देशांच्या यादीत रशिया दुसऱ्या स्थानी आहे तर युक्रेन 22 व्या. रशियाकडे 8 लाख 50 हजार जवानांची फौज आहे. दुसरीकडे युक्रेनकडे दोन ते दीड लाखच सक्रीय सैनिक आहेत. मात्र दोन्ही देशांकडे राखीव सैन्याची संख्या अडीच लाख इतकी आहे.
एअरफोर्स कसे आहे?
रशियन एअरफोर्स हे आकाराच्या दृष्टीने जगातील दुसरं सर्वात मोठं एअरफोर्स आहे. यात युक्रेन 31 व्या स्थानी आहे. रशियाकडे एकूण 4 हजार 173 विमानं आहेत. तर युक्रेनकडे 318 विमानं आहेत. रशियाकडे एकूण 772 फायटर जेट्स आहेत. तर युक्रेनकडे 69 फायटर जेट्स आहेत.
जमीनीवरील लष्करी सामर्थ्य किती?
याबाबतीत रशियाहून शक्तीशाली देश जगात नाही. रशियाकडे एकूण 12 हजार 420 रणगाडे आहेत. युक्रेनकडे 2 हजार 596 रणगाडे आहेत.
नौदल सामर्थ्य किती?
युक्रेनकडील 38 युद्धनौका या रशियाच्या 600 जहाजांसमोर काहीच नाही. तर समुद्रात हल्ला करण्यासाठी रशियाकडे 70 पाणबुड्या आहेत तर युक्रेनकडे एकही नाही.
युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेजनिकोव यांनी पाश्चिमात्य देशांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत.