मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी रशिया युक्रेनवर हल्ला करु शकतो, असा अंदाज वर्तवला होता. शेवटी, ज्याची भीती होती, तेच झाले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे.

रशिनायाने आज युक्रेनवर हल्ला केला. रशियाला हल्ल्याला युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. रशियाचे 100 पेक्षा जास्त सैन्य मारल्याचा दावा, युक्रेनने केला आहे. सात रशियन विमाने, चार हेलिकॉप्टर्स आणि लष्करी वाहने उद्धवस्त केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे.

युक्रेनचे 70 लष्करी तळ बेचिराख केल्याचा दावा रशियाने केला आहे. दोन्ही देशात सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार पेक्षा जास्त भारतीय अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला विदेशमंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि एवएसए अजित डोभाल उपस्थित असणार आहेत.