रत्नागिरी, देवरुख, चिपळुण, दापोली, मंडणगड, लांजा या तालुक्यातील विद्यार्थी अडकले युक्रेन मध्ये

दापोली :- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 1200 च्या वर विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनास विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आठ विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षणासाठी गेलेले आठ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. हे विद्यार्थी खालील प्रमाणे

देवरूख येथील तीन विद्यार्थी अद्वैत कदम, जान्हवी शिंदे आणि साक्षी नरोटे युक्रेन मधील खारकीव्ह शहरात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तर दापोली येथील ऐश्वर्या मंगेश सावंत, मंडणगड येथील आकाश अनंत कोगंक ,चिपळूण येथील वृषभनाथ राजेंद्र मोलाज , मुस्कान मन्सुर सोलकर मिरकवाडा रत्नागिरी ,सलोनी साजिद मिनार लांजा सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.