देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला झाल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाल्यामुळे कच्चं तेल आणखी महाग होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.