दापोलीत हिरवी आणि पिवळ्या रंगाची कलिंगड आगरवायंगणी येथील प्रवीण बेंडल या शेतक-यानी रास्त दरात उपलब्ध केली आहेत. पिवळे विशाल जातीचे कलिंगड आतून लाल आहे आणि हिरवे कलिंगड अनमोल जातीचे असून आतून पिवळे आहे.तर याच्या बियाण्याची पन्नास ग्रॅमची किंमत साडेचारहजार रूपये आहे.या उपक्रमाला महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती या शेतक-यानी दिली.

तालुक्यातील आगरवायंगणी ,कुडावळे ,गव्हे आदी ग्रामीण भागातून शेतकरी आपला पिकवलेला माल घेऊन दापोली बाजारात आता थेट विक्री करू लागले आहेत. पालेभाज्या आणि फळभाज्या मिळून प्रतीदिन सुमारे एक टन इतकी विक्री होत असल्याची माहिती कृतीशील शेतकरी आणि ग्रामोदयचे संस्थापक विनय महाजन यानी दिली. शेतक-याचा थेट माल ग्राहकाना उपलब्ध होत असल्याने शेतक-याच्या नफ्यात वाढ झाली असून अधिकाधिक शेतकरी कृषीमालाकडे आता आल्यामुळे वळू लागला असल्याची माहितीही त्यानी दिली.