मंडणगड- मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष पदाचे निवडीकरिता आज मंडणगड नगरपंचायत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून विनोद जाधव तर महाविकास आघाडीकडून अँड. सोनल बेर्डे यांनी अर्ज दाखल केले होते सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करुन निवडणुक मतदान प्रक्रीया राबवण्यात आली. यावेळी अँड. सोनल बेर्डे यांच्या बाजूने 9 नगरसेवकांनी हात वर करुन आपले समर्थन जाहीर केले तर विनोद जाधव यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एका मताचे फरकाने अँड. सोनल बेर्डे यांची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे यांनी प्रक्रीयेचे प्रशासकीय सोपस्कर पुर्ण केल्यानंतर जाहीर केले.
उपनगराध्यक्ष पदासाठी आजच अर्ज दाखल करायचे होते त्यानुसार महाविकास आघाडीकडून वैभव कोकाटे तर शहर विकास आघाडीचेवतीने आदेश मर्चंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्षांची निवडीनंतर उपनगराध्यक्षाची निवड प्रक्रीयाही हात वर करुन राबवण्यात आली. यामध्ये वैभव कोकाटे यांना 9 तर आदेश मर्चंडे यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले एकामताने वैभव कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी निवडी झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे यांनी निवडणुकीचे प्रशासकीय सोपस्कर पुर्ण केल्यानंतर जाहीर केले. नगराध्यक्षपदी निवड झालेल्या अँड. सोनल बेर्डे व उप नगराध्यक्षपदी निवड झालेले वैभव कोकाटे यांचे आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सायली कदम, दापोलीचे माजी सभापती राजेश गुजर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, नेहा जाधव, दीपक घोसाळकर, दिनेश सापटे, दीनेश लेंडे, राजाराम लेंढे, राकेश साळुखे आदी मान्यवर उपस्थीत होते.
फोटो ओळी- नगराध्यक्ष अँड. सोनल बेर्डे व उप नगराध्यक्ष वैभव कोकाटे यांचे निवडीनंतर अभिनंदन करताना माजी आमदार संजय कदम व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते