कणकवली शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर तात्काळ जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज करण्यात येणार आहे, असे राणे यांचे वकील मानशिंदे व संग्राम देसाई यांनी सांगितले. दरम्यान मोबाईल जप्त करून सुद्धा पोलिसांना कुठलाही पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, असे देसाई म्हणाले.