दापोली : दापोलीतील कामगार गल्ली येथील जयवंत गोरीवले यांच्या दुकानाला काहि दिवसापुर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर गोरिवले परिवाराने आपत्कालीन निधी नावाने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले.
रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यामधून मदतीचा ओघ सुरू केला. दोन्ही जिल्ह्यातील गोरीवले कुटुंबीयांनी रायगड आणि दापोली मधील दुर्घटनाग्रस्त जयवंत गोरीवले यांच्या दुकानाला भेट दिली. यावेळी जयवंत गोरीवले यांना ओवरलॉकची मशिन प्राथमिक स्वरूपात मदत म्हणून देण्यात आली. तसेच गोरीवले परिवारातील सदस्यांनी व देवके गावातील संजय गोरिवले यांच्या प्रयत्नाने गुंज या संस्थेकडे संपर्क करून आणखी दोन शिलाई मशिन व इतर साहित्य मिळवून दिले.