दापोली :-दापोली तालुक्यात जि.प. डौली येथे शाळेला रुपेश  अंधारी व रुपेश महाडीक या दोहोंच्या सौजन्याने पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर भेट देण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी भेटवस्तू देण्याची इच्छा रुपेश अंधारी यांच्या विचाराधीन होती. परंतु कोविड पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे त्यांचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शाळा सुरू झाल्यावर शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी एक वॉटर प्युरीफायर देण्याचे गावचे पोलीस पाटील रुपेश महाडीक यांनी सुचवले आणि या दोघांनीही संयुक्तरित्या  संकल्पना अमलात आणली.यापुढेही भविष्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या,पुस्तके,स्कुलबॅग आदी वस्तूंची गरज भासल्यास आपण स्वेच्छेने देऊ असे त्यांनी बोलताना सांगितले.
डौली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश महाडीक यांनीही शाळेला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप गुंजाळ यांनी आभार व्यक्त केले.