चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर विविध भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी आदींनी पाठिंबा दर्शविला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके व राजेंद्र महाडिक ,काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे पालकमंत्री अनिल परब ,मंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार भास्कर जाधव ,राजन साळवी,शेखर निकम आदींनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता .जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा येथे हे रास्ता रोको होणार आहे.