दापोली २५:- हवामानातील सततच्या बदलाचा परिणाम अवघ्या महाराष्ट्रावर होत आहे. अवकाळी पाऊस,धुळीच्या वादळाचा प्रभाव,गारपीट यामुळे गेले काही दिवस दापोलीच्या रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे . काल हे किमान तापमान 8.3 अंशावर स्थिरावले. दिवसभरही वा-याच्या झुळूकांमुळे वातावरणातील गारवा होता.
मिनी महाबळेश्वरचे तापमान घटत असले तरी या मौसमात होणारी पर्यटकांची गर्दी मात्र कोरोनाच्या सावटामुळे ओसरल्याचे चित्र आहे.