रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक कोरोनाबाधित सापडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून माध्यमिक, प्राथमिक शाळा चालू करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.प्रत्यक्ष अध्यापनाचा निर्णय चार दिवसांनी होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळेची घंटा पुन्हा वाजेल, अशी शक्यता आहे.