रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव , ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका यामुळे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार सुधारीत आदेश जारी करून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होत आहे.

प्रमुखाच्या लेखी, स्पष्ट परवानगीशिवाय अभ्यागतांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व कार्यालयीन प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून ठेवायचे आहेत. शासकीय कार्यालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावयाची आहे.