दापोली:- दापोली तालुका खरेदी विक्री संघाचा भात खरेदीविक्रीचा शुभारंभ नुकताच संघाच्या कार्यालयात करण्यात आला.
शेतकऱयांकडून भाताच्या गाडय़ा आता खरेदीविक्री संघात भरून येत आहेत. सर्वसाधारण भात 1940 रूपये प्रती क्विंटल असून हा खरेदीविक्रीचा कालावधी 3 महिने चालणार असल्याचे अध्यक्ष श्री. सुधीर कालेकर यांनी जाहीर केले. या खरेदीविक्रीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक व ख़रेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री .सुधीर कालेकर, उपाध्यक्ष वसंत शिंदे, संचालक भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, राजेंद्र पेठकर, प्रितम रूके, दादा शिगवण, कृष्णकुमार बुटाला विठ्ठल खोत, रमेश पवार, विनोद आवळे, संचालिका वर्षा शिर्के, रेश्मा नेवरेकर, कर्मचारी अनिल भुवड बोंडिवली येथील शेतकरी बबन मळेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.