महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा हे ट्विटरवर सक्रिय असतात. त्याच्या ट्विटर हँडलवर ते अनेक अनोखे व्हिडिओ शेअर करतात. तसेच क्रिएटिव्ह लोकांना नोकरीच्या ऑफर देत असतात. आता त्यांनी केवळ १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी लवकरच जर्मनीच्या ऑटोमोबिली Pininfarina या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार Battista चे उत्पादन सुरू करणार आहे. एका मीडिया रिपोर्टचा हवाला देऊन, नुकतेच हे उघड झाले आहे की कंपनीने यासाठी निधी उभारण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. Battista ही हायपर इलेक्ट्रिक कार आहे. या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

Pininfarina Battista इलेक्ट्रिक कारमध्ये १२० किलोवॅटची लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही कार १९०० एचपी पॉवर जनरेट करते. या कारमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स असून कारच्या चार चाकांना वेगवेगळी ऊर्जा पुरवतात. यामुळे ही इलेक्ट्रिक कार वेगाच्या बाबतीत ओव्हरटेक करू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पिनिनफारिना बॅटिस्टा केवळ २ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवते. १२ सेकंदात ३०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ३५० किमी प्रतितास आहे. Pininfarina Battista इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे २२ लाख डॉलर (जवळपास १६.३५ कोटी रुपये) आहे.

कंपनीचा दावा आहे की Pininfarina Battista इलेक्ट्रिक कार एका चार्जवर ५०० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कंपनी या कारचे फक्त १५० युनिट्स बनवणार असून जगभरातील बाजारात विकले जाणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारचे ५० युनिट्स युरोपमध्ये, ५० युनिट्स अमेरिकेत आणि ५० युनिट्स पश्चिम आशिया आणि आशियाई मार्केटमध्ये विकले जातील. सध्या अमेरिका आणि युरोपमधील रस्ते आणि ट्रॅकवर चाचणी सुरू आहे.