कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्यापार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन करणारे वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेते वेगवेगळ्या लग्न समारंभांना उपस्थित राहून नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत.त्यातच मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थित अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. बाळकृष्ण विखे पाटील, स्वत: हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ आता मंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. बाळासाहेब थोरात विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील सहभागी होते.
मंगळवारी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात राजकारणापासून ते वेगवेळ्या क्षेत्रापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर आज स्वत: हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.