लंडन – करोना च्या ओमिक्रोन आवृत्तीने जगभर चिंतेचे वातावरण आहे. त्यातच तज्ज्ञानी व्यक्त केलेल्या शक्यतेने चिंतेत भर पडली आहे. ओमिक्रोन या आवृत्तीचा विषाणू द आफ्रिकेत सापडल्यापासून अमेरिकेत संसर्ग होणाऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण ओमीक्रोचे आहे. त्याने डेल्टा आवृत्तीची जागा घेतली आहे.
जर या विषाणूच्या अतिसंसर्गशील या दोन आवृत्ती एकत्र येऊन या विषाणूची सुपर आवृत्ती तयार होईल का? मॉडरनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बुर्तन यांच्या मते ही शक्यता आहे.
ब्रिटिश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीपुढे ते बोलत होते. जर एखाद्याला डेल्टा आणि ओमीक्रोन आवृत्तीचा संसर्ग एकाचवेळी झाला तर ते शक्य आहे. त्याबाबतचा तपशील उपलब्ध आहे. दक्षिण आफ्रिकेतून झालेल्या संशोधनातून पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेल्या व्यक्तींमध्ये विषाणूच्या या दोन्ही आवृत्ती आढळून आल्या आहेत, असे ते म्हणाले असे वृत्त डेली मेलने दिले आहे.
डेल्टा आणि ओमीक्रोनचे संसर्गित इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे या दोन विषाणूंच्या संयोगातून आणखी एक घातक आवृत्ती तयार होणे शक्य आहे. असे संयोगिकरण दुर्मिळ असले तरी पोषक वातावरण मिळाल्यास त्याची शक्यता नाकारता येत नाही
नॉर्थ साऊथ विद्यापीठातील पीटर व्हाईट यांनीही हा इशारा दिला आहे. ते म्हणाले अल्फा आणि बी.1.177 यांच्या संयोगिकरणाची तीन उदाहरणे आढळली आहेत. अर्थात अशी संयोगिकरणातून निर्माण झालेल्या घातक आवृत्तीतून मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याची नोंद नाही मात्र तरीही संशोधक या बदलांवर लक्ष ठेवून आहेत.