जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांनी विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात 350 महिला या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. गेली काही वर्षे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी या महिला आंदोलन करत आहेत. आता पुन्हा एल्गार केला आहे. 22 डिसेंबरपासून कामबंद आंदोलनाबरोबरच मुंबई विधिमंडळावर बेमुदत धरणे सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी जि. प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे, मोहिनी पवार, ज्योती सावंत, मंगला पवार आदी उपस्थित होत्या.