नवी दिल्ली– ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मंत्री व ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले,ओबीसी आरक्षण याचिकेवर उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. मध्यप्रदेशची केस देखील काहीशी आपल्या सारखीच आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता OBC प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
मध्य प्रदेशसाठी तुषार मेहता केस लढत आहेत. इतर राज्यामध्ये देखील आपल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उद्या निर्णय होणार असल्याचे समजते.