सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ लोक परदेशातून दाखल झाले आहेत. यातील ४५ जणांचा शोध लागला आहे. त्यातील २० जणांची तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.उर्वरित २० जणांचा अहवाल ११ तारखेपर्यंत येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लसीकरण हाच ओमिक्राँनवर एकच उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.