ओमायक्रॉनचा विषाणू आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. पुण्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले होते. मात्र आता या संदर्भात दिलासादायक वृत्त समोर आले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयी माहिती दिली.
पुण्यातील ओमिक्रॉन बाधित 5 रुग्ण ओमिक्रॉन मुक्त झाले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यात पुण्यातील 1 तर पिंपरी चिंचवडच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान पुण्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणात पहिल्या डोसचे लसीकरण 100 टक्के झाले आहे. परंतु दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी बुस्टर डोसविषयी मत व्यक्त केलं. राज्यात पहिल्यांदा दोन डोस कसे देता येईल यावर भर दिला आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना करोनाचा त्रास होत नाही असे सिद्ध झाले आहे. काही ठिकाणी बुस्टर डोस घेतले त्यांना त्रास झाला आहे. परंतु बुस्टरचा डोस देण्याचा निर्णय देश पातळीवर घेण्यात येईल. त्यामुळे केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्याबाबत निर्णय घ्यावा असही अजित पवार यांनी म्हटलं.